मधुबन कट्ट्यावर होणार ‘आगमन पावसाचे’ विषयावर कवी संमेलन.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12
प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला विमला तलाव उरण शहर येथे कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप ) व मधुबन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गार्डन मध्ये मोकळ्या जागेत कवी संमेलन आयोजित केले जाते.या महिन्याचे कवी संमेलन मोठया उत्साहात साजरे होणार आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी कासावीस झालेल्या जीवसृष्टीला गारवा देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. पाऊस आणि मानव यांचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे, एक अतूट असं नातं आहे. आणि हेच नातं विशद करण्यासाठी आगमन पावसाचे या विषयावर मधुबन कट्ट्याचा १२८ वा. कवितांचा कार्यक्रम बुधवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजता उरण शहरातील विमला तलाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ कवी तथा जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील व चैतन्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कवी संमेलनाच्या निमित्ताने सुरेश शिंदे, व पुंडलिक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दरम्यान काव्य संमेलनाचे औचित्य साधून, टोल विरुद्ध एल्गार या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुनील पाटील, अवंतिका महाडिक मनोहर म्हात्रे, वैभव धनवडे, कल्पना दिलीप म्हापूसकर, नरेश पाटील यांना पारितोषिके देऊन, गौरविण्यात येणार आहे.याप्रसंगी कवी, साहित्यिक, रसिक प्रेषकांनी या कवी संमेलनला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




