pub-7425537887339079
ब्रेकिंग

मोबाईलची रेंज फाईव्ह जी शतक एकविसावे! तरी रात्री अंधार. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

दिवस आठ घंटे सिंगल फेज लाईट. रात्री अंधार. जीवन जगण्याची वाढली चिंता. शिक्षण आरोग्यावर परिणाम.

0 4 6 1 8 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10

टेंभुर्णी येथील आज ही बरेच घर शेती साठी आपल्या शेती वस्ती मध्ये वास्तव्यास आहे. शेतीचे काम करण्यासाठी घरून शेती होत नसल्याने शेतीकडील वस्ती मध्ये त्यांना राहावे लागते. मात्र येथील लाईट ची मोठी समस्या शी त्यांना सामना करावा लागत असून गेल्या एका महिन्या पासून ते या समस्या सोबत आपले निराशा मय जीवन जगत आहे. दिवस लाईट आणि दिवसाचे उजेड या मुळे दिवस निघून जाते मात्र रात्री मोठ्या अडचणीत जाण्याची माहिती या वस्ती वाले कुटुंब यांनी दिली. पुर्वेकडील कुमकर वस्ती जोशी डुकरे परिवार अश्या अनेक कुटुंब मिळून जवळपास 60 परिवार वास्तव्यास आहे.त्यांचे मुले त्यांचे शिक्षण रात्री आरोग्याची येणारी अडचण शेतात असल्यामुळे साप विंचू यांची अडचण आणि एकीकडे असल्याने आणि लाईट नसल्याने चोरीची अडचण अश्या अनेक समस्या ना तोंड देत जीवन किती संघर्षमय असणार याची कल्पना न केलेली बरी. एकदा दिवसाची अडचण समजू शकते मात्र रात्रीची लाईट नाही जे आजच्या काळात जगणे म्हणजे पापच म्हणता येईल. या तून आम्हाला काढा अशी विनंती मागणी या सर्व कुटूंब यांनी केली असून या कडे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कसे लक्ष्य देतात हे पहावे लागेल. देश एकविसाव्या शतकात आहे मोबाईलची रेंज असून जर सरकार पूर्ण वेळ लाईट देऊ शकत नाही या सारखे दुसरे दुर्दैव नाही. कुमकर वस्ती वरील अतुल लक्ष्मण कुमकर (विद्यार्थी) अंकुश मोतीराम घाटे पालक दत्तू बालाजी कुमकर पालक देविदास विश्वनाथ कुमकर डुकरे वस्ती विशाल शांताराम पाचे सुनील जनाजी जोशी रामदास उखणराव जोशी जाधव वस्ती भगवान रामदास भोरे परमेश्वर पुरुषोत्तम जाधव वैष्णवी कारभारी जाधव विद्यार्थी सुनील जैनाजी जोशी सुनील पाराजी भागवत आशिष अनेक परिवार सध्या यांनी पूर्ण वेळ लाईट देण्याची विनंती केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे