pub-7425537887339079
ब्रेकिंग

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या नळविहिरा येथे मासिक चर्चासत्र उत्साहात संपन्न

शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 10

शेतकऱ्यांनी,शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी स्वयंप्रेरणेने उभारलेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने दर महिन्याच्या ९ तारखेला आयोजित करण्यात येणारे नियमित मासिक चर्चासत्र मंगळवार दि. ९ जून २०२६ रोजी मौजे नळविहिरा येथील पाटील स्मृती,पाटील कृषी फार्म,दमयंती नगरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात शिवारफेरीने झाली. उपस्थित शेतकरी बांधवांनी फार्मवरील विविध पीकपद्धती,फळबाग,सेंद्रिय शेतीचे प्रयोग,मुलस्थानी जलसंधारणाचे प्रयोग तसेच कमी खर्चातील शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष पाहणी केली. शिवारफेरी दरम्यान शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले तसेच विविध विषयांवर चर्चा केली. चर्चासत्राची सुरुवात मातृवंदनेने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे नैसर्गिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत शेतकऱ्यांमध्ये ज्ञान,संशोधन व अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणण्याचे महत्त्व विशद केले. या चर्चासत्रासाठी अमोलजी शिंदे (तालुका कृषी अधिकारी,जाफ्राबाद),ज्ञानेश्वरजी इधाटे (विभागीय समन्वयक,पाणी फाउंडेशन) आणि भगवानरावजी डोंगरे (चेअरमन,आयडियल ॲग्रीटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,सावरगाव हडप) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना अमोलजी शिंदे यांनी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वैज्ञानिक शेती पद्धती स्वीकाराव्यात असे आवाहन केले. ज्ञानेश्वरजी इधाटे यांनी जलसंधारण,पाणी व्यवस्थापन आणि सामुदायिक सहभागाचे महत्त्व पटवून दिले. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होऊ शकते,असे त्यांनी सांगितले. भगवानरावजी डोंगरे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका,सामूहिक विपणन,मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी याविषयी मार्गदर्शन केले. संघटित प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चर्चासत्रात उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव,अडचणी आणि यशोगाथा मांडल्या. विविध पिकांचे व्यवस्थापन,नैसर्गिक शेती,फळबाग लागवड,बाजारपेठेतील बदल आणि शेतकरी संघटन शक्तीची भूमिका या विषयांवर मुक्त चर्चा झाली. कार्यक्रमास पाणी फाउंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी असलम बेग,किशोर इंगोले,सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्नील पाटील,गेवराईचे अनिकेत तौर,वखारीचे रामप्रसाद खैरे,दहिगावचे नंदकिशोर देशमुख,डोलखेडा खुर्दचे भानुदासराव डोईफोडे,टेंभुर्णीचे जगन्नाथनाना देशमुख,गोंधनखेडचे संजय बोऱ्हाडे,नळविहिरा येथील ज्ञानेश्वर गाडेकर,हरिष मोरे,डॉ.स्वराज मोरे,संदेश मोरे,दिगांबर मोरे,युवराज मोरे,महादू गाडेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर उपस्थितांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. “साद तुमची,साथ आमची” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणून ज्ञान,संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी अशा चर्चासत्रांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे