जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 9
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.




