pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज. महाराजस्व अभियान संपन्न

0 4 1 2 0 3
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.10

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल समाधान शिबिराचे आयोजन जे. बी. के. विद्यालय, टेंभूर्णी येथे करण्यात आले.

या शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री. जितेंद्र पापळकर, जालना जिल्हाधिकारी सौ. अशीमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. रमेश मिसाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकरदन श्री. वी. सर्वनन, तसेच तहसीलदार श्री. अविनाश लोढे उपस्थित होते.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के, मधुकर गाढे, विजय परिहार, मनोज शिंदे, दत्तू पंडित, गोविंद पंडित, दादाराव सवडे, सुमन म्हस्के यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास शेतकरी, कष्टकरी, शालेय विद्यार्थी, अपंग, निराधार, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व स्वागत गीताने करण्यात आली. तसेच मान्यवरांचे स्वागत मुख्य प्रवेशद्वारापासून लेझीम, ढोल पथकाच्या वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या शिबिरामध्ये आरोग्य विभागामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच बेबी किटचे वितरण करण्यात आले. याशिवाय कृषी विभागाकडून ट्रॅक्टर व हार्वेस्टर संबंधी मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये मंडळ अधिकारी श्री. संतोष कपूर, ग्राम महसूल अधिकारी भिमराज ब्राम्हणे, अमोल मुरकुटे, नयूम पठाण, माधव साळवे, अरविंद उरफाटे, प्रकाश समिंद्रे, योगिता बारोटे, अण्णा कड व इतर ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार मंगेश साबळे, सुरेश मिसाळ, मीना चव्हाण, पेरके यांचीही उपस्थिती होती. मंडळातील विविध गावांचे सरपंचही कार्यक्रमास उपस्थित होते.

सदर महसूल समाधान शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये उत्पन्न, जात, ईडब्ल्यूएस इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे तत्काळ निवारण करून प्रशासनाने जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले.

कार्यक्रम संपल्यानंतर लाभार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन तहसीलदार श्री. अविनाश लोढे यांनी केले.
या शिबिरामुळे नागरिकांना शासनाच्या सेवा एकाच छताखाली मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे