उरण महाविद्यालयात विकसित भारत या विषयी परिसंवाद संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयातील वाणिज्य तसेच अकाउंटिंग फायनान्स विभागा तर्फे “विकसित भारत २०४७ “या विषयावर अखिल भारतीय स्तरावर इ- कॉन्फरेन्स चे आयोजन करण्यात आले. या इ -कॉन्फरेन्स चे उदघाटन नागालँड विद्यापीठा चे कुलगुरू डॉ. जगदीश कुमार पटनाईक यांनी केले तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा चे माजी कुलगुरू डॉ इ. वायूनंदन हे विशेष अतिथी म्हणून लाभले. महाविद्यालया चे प्राचार्य डॉ वाल्मिक गर्जे यांनी या इ- कॉन्फरेन्स ची आवश्यकता सांगून आयोजना चे महत्व सांगितले.या प्रसंगी जेएनयु दिल्ली येथील डॉ अरविंद एलरी यांनी या प्रसंगी आपली भूमिका विशद केली. या परीसंवादास संशोधक विध्यार्थी यांनी भरघोस प्रतिसाद दिला असून एकूण १४७ संशोधन पेपर प्राप्त झाले . काही विध्यार्थी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.या कामी डॉ कुलदीप शर्मा, डॉ मृदुल निळे, डॉ. मंदार चौधरी, डॉ उपेंद्र चौधरी डॉ चंद्रमोहन जोशी डॉ सुरेश मैद्य डॉ देविदास गेल्हार हे पॅनलिस्ट म्हणून लाभले. परीसंवादा ची सांगता बनारस विद्यापीठातील डॉ तेज प्रताप सिंग यांच्या भाषणाने झाली. अध्यक्ष कपिल पाटील व प्राचार्य डॉ वाल्मिक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कॉन्फरेन्स चे सूत्रसंचालन डॉ हन्नत शेख यांनी केले. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा व्ही एस इंदुलकर, तसेच डॉ पराग कारुळकर, प्रा. रियाझ पठाण, डॉ हनुमंतराव जगताप डॉ. अरुण चव्हाण, प्रा. विनिता तांडेल प्रा गुप्ता प्रा.दिपू यादव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी यांनी या करिता विशेष मेहनत घेतली.


