भोईपुऱ्यातील “त्या” नाल्यांची सफाई करून अतिक्रमण तात्काळ हटवा
मनपा आयुक्त अंजली शर्मा यांचे आदेश

जालना/प्रतिनीधी,दि.10
जुना जालना भागातील मोठया नाल्यांची सफाई करून सदर नाल्यांवरील अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश जालना मनपाच्या आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी स्वच्छ्ता विभाग प्रमुखांना दिले आहेत. जालना शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या जोरदार पाऊसामुळे जालना महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मानसूनपूर्व स्वच्छ्ता मोहिमेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले. प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर यांनी भोईपुरा आणि सरस्वती भुवन प्रशाला परिसरातील प्रथम पाहणी करून तेथील नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेत सदर अडचणी आणि समस्या मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अंजली शर्मा यांनी आज बुधवार दि.१० जून रोजी जुना जालना भागातील प्रभाग क्रमांक 14 मधील भोईपुरा, सरस्वती भुवन प्रश्नाला या परिसरातून वाहणाऱ्या मोठया नाल्याची पाहणी करून सदर नाल्यावर झालेले अतिक्रमण तसेच नाल्यांमध्ये मोठया प्रमाणावर साचलेला गाळ याची तात्काळ दाखल घेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करत नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून लवकरात लवकर स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित अधिकारी स्वच्छता विभाग प्रमुखांना दिले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, नगरसेवक शशिकांत घुगे, सिद्धीविनायक मुळे, सुनील एखंडे,शहर अभियंता सय्यद सउद, स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डहाळे, स्वच्छता निरीक्षक मंगेश साठे, अरुण वानखेडे, शोएब पठाण, श्रावण सराटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते. image.png


