pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणच्या १७ तारखेचा आगळा वेगळा आनंद ! कवी संमेलन उत्साहात संपन्न..

0 4 5 5 3 2
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

दर १७ तारखेला उरण शहरातील विमला तलावावर कविकट्टा नियमित भरतो ऐकून होतो,तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद कोमसाप उरणने दिलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदामुळे मिळाला.कट्ट्यावरची सहजता, कार्यकर्त्यांची,तत्परता आणि अध्यक्षांचे कामामातील योगदान आणि मांडणी आगळीवेगळी आणि आनंददायी वाटली असे विचार अध्यक्ष डॉ जयपाल पाटील यांनी मांडले.यावेळी साहित्य रत्न प्रा.एल.बी.पाटील, कोकण रस्त्याचे अभ्यासक चैतन्य उषा लक्ष्मण, प्राचार्य साहेबराव ओहोळ , भुवनेश्वर पाटील, राम म्हात्रे,देवदत्त सूर्यवंशी, मारोती तांबे, मिना ब्रीद,प्रवीण पुरो, विवेक भांडारकर,जेष्ठ पत्रकार घनशाम कडू, तृप्ती भोईर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय होळकर यांनी उत्तमपणे केले. आगरी ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले,तर सुनील पाटील, मनोहर म्हात्रे,न.ग. पाटील,अवंतिका महाडिक, वैभव धनावडे ,कल्पना म्हापुसकर यांना बक्षिस पात्र ” एल्गार टोल विरुध्द कवितां ” साठी सन्मानित करण्यात आले. झालेल्या कविसंमेलनात संजीव पाटील,अनिल भोईर, हेमंत पाटील,सूरेश मिस्त्री, रामचंद्र म्हात्रे, अनामिका राम,मनोहर म्हात्रे,नारायण पाटील,संजय होळकर, सुनील पाटील यांनी पावसाच्या आगमनानंतर कविता सादर केल्या.सदर कवी संमेलन मोठया उत्साहात आनंदमय वातावरणात संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 3 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे