pub-7425537887339079
ब्रेकिंग

पारंपारिक तेला फाटा देत रक्षाविसर्जनाऐवजी शेतात लावले आंब्याचे झाड; वृक्षरूपाने जपल्या सवडे कुटुंबाने आईच्या आठवणी,, जल प्रदूषण टाळले

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

टेंभुर्णी : जुन्या, पारंपरिक रूढी- परंपरांना छेद देत, शेतातच रक्षा विसर्जन करून वृक्षरूपाने आईच्या आठवणी जपण्याचे काम येथील सवडे कुटुंबाने घेऊन आदर्श निर्माण केला आहे. दि. १७ जून २०२६ रोजी सरूबाई रामराव सवडे यांचे निधन झाले. दुःखातही या कुटुंबाने पर्यावरणपूरक निर्णय घेऊन समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. रक्षाविसर्जन हे नदी किवा तलावाच्या पाण्यात करण्याची परंपरा आहे. परंतु, यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि आपल्या लाडक्या व्यक्तीची आठवण कायमस्वरूपी जपण्यासाठी सवडे कुटुंबाने या पंरपरेला फाटा देण्याचे ठरवले आणि कै. सरूबाई यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम स्वतःच्या शेतातील ‘मोहाच्या मळ्यात’ करण्यात आला. सवडे कुटुंबाने कै. सरूबाई यांच्या राखेचे विसर्जन करून त्याच ठिकाणी एका आंब्याच्या वृक्षाचे रोपण केले. ‘नदीच्या पाण्यात अस्थी विसर्जन केल्याने त्या वाहून जातात. पण शेतात झाड लावून त्यात रक्षा विसर्जित केल्यामुळे, आईच्या स्मृती या वृक्षाच्या रूपाने कायम आमच्यासोबत.

———————————————————————–

‘मी देशाच्या सीमेवर राहून देशाची सेवा केली. आज आईच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या स्मृती जिवंत वृक्षाच्या रूपाने सदैव आमच्यासोबत राहाव्यात, अशी इच्छा होती. नदी-तलाव प्रदूषित करण्यापेक्षा निसर्गाला काहीतरी परत देणे हीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल, याच भावनेतून आम्ही आंब्याचे झाड लावण्याचा निर्णय घेतला.’ – माजी सैनिक मोहन रामराव सवडे, अकोलादेव. — राहतील.’ अशी भावना सवडे कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे