समाजप्रबोधन हाच ‘मी रमाई’ नाटकाचा हेतू : अभिनेत्री उबाळे
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23
माता रमाई यांनी एक आदर्श माता, भगिणी, पत्नी कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे. त्यांचा जीवनप्रवास समाजातील तळागाळातील घटकाला समजावा. कलेतून प्रबोधन व्हावे. एवढीच अपेक्षा ‘मी रमाई’ या एकपात्री नाटकातून आहे, अशी माहिती ‘मी रमाई’ या एकपात्री नाटकाच्या अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील हिंदुस्तान लॉन्सवर सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी निर्माते प्रकाश वाघ, शंकर हिवाळे, तालुका वकील ___________________ चौकट:- नाटकात जिवंत देखावे: या एकपात्री नाटकातून माता रमाईंचा खरा इतिहास घराघरांमध्ये पोहोचला पाहिजे. या नाटकाच्या रंगमंचावर राजगृह, वंदन गाव, डबक चाळ यांचे भव्य नेपथ्य उभारण्यात आले आहे. जिवंत देखावे साकारण्यात आले आहेत. प्रेक्षकांना तत्कालीन इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे. बुद्धभूमी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक ३५ व्या नाट्यप्रयोगाला जाफराबाद तालुक्यातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी. माता रमाबाई आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनाचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहनही सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी केले. ___________________ संघाचे अध्यक्ष अॅड. विनोद डिगे, सुरेश जंजाळ, शाहीर अनिल भदर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुदामराव सदाशिवे करतात. त्यांच्या विशेष पुढाकारातून हा कार्यक्रम जाफराबाद शहरात होत आहे. यासाठी विशेष सहकार्य सोनाजी नावकर यांचे आहे. ‘मी रमाई’ या एकपात्री नाटकातील माता रमाबाईंची भूमिका साकारण्यामागचा हेतू सांगताना सिने अभिनेत्री उबाळे म्हणाल्या की, आजपर्यंत माता रमाबाई आंबेडकर यांचे दारिद्रय, हालअपेष्टा, त्याग हाच विषय लोकांपर्यंत आलेला आहे. मात्र ‘मी रमाई’ या एकपात्री नाटकात त्यांचे धाडसी व्यक्तिमत्त्व मांडले आहे. त्यांची संघर्षशीलता मांडली आहे. एका महिलेने समाज, घर, कुटुंब यांचे नेतृत्व कसे करावे, हे दाखवले आहे. आलेल्या संकटावर कशी मात करावी, हेही दाखवले आहे. त्यांची जिद्द, धाडस, चिकाटी मांडली आहे. स्त्रीशक्तीचा असामान्य, सामर्थ्यवान आदर्श इतिहास सर्वसामान्यांना ज्ञात व्हावा, हा उद्देश आहे. माता रमाबाई आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलेने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत एक पाऊल पुढे टाकावे. सर्व क्षेत्रांत प्रगती करावी. माता रमाबाई आंबेडकर यांचा संघर्ष, त्याग, धैर्य, स्वाभिमान, सामाजिक समर्पणाचा इतिहास प्रभावीपणे मांडावा. हे या नाटकाच्या माध्यमातून व्हावे. समाजात कलेच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. अखंड मानवजातीमध्ये परिवर्तन व्हावे. प्रत्येक जाती-धर्मात परिवर्तन व्हावे. हाच यामागील हेतू असल्याचे उबाळे यांनी सांगितले.



