pub-7425537887339079
ब्रेकिंग

रक्षाविसर्जन वृक्ष लागवडीने, अनोख्या प्रयोगाने गणेशपुर वाशी भारावले

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.5

टेंभुर्णी येथूनच जवळ असलेल्या गणेशपुर या गावी वडिलांच्या रक्षाविसर्जनानिमित्त वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. अनेकजण रक्षाविसर्जनाच्या

दिवशी जमा केलेली राख ही नदीत नेऊन टाकतात. त्यामुळे पाण्याचेही प्रदूषण होते. या परंपरेला फाटा देत जाफराबाद तालुक्यातील गणेशपूर येथील कृषिभूषण माधवराव अंधारे यांनी वृक्ष लागवडीचा एक अनोखा संदेश दिला आहे. १०५ वर्षीय त्यांचे वडील बापूराव अंधारे यांचे नुकतेच निधन झाले. सुरुवातीपासूनच वृक्ष संवर्धनाचा छंद असलेल्या आपल्या वडिलांच्या आठवणीत काही झाडे लावावीत हा संकल्प त्यांनी ठरविला होता आणि वडिलांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी त्यांनी वडिलांच्या राखेवर आंबा, जांभूळ, वड, पिंपळ, आदी प्रकारची ५० झाडे लावून हा संकल्प पूर्ण केला आहे. मृत व्यक्तीची राख इकडे तिकडे पाण्यात

———————————————————————
वडिलांनी लावलेली ५० ते ६० महाकाय झाडे आज अनेकांना सावली व फळे देत आहे. भविष्यातील तरुण पिढीलाही वृक्ष लागवडीचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम राबविला आहे.

माधवराव अंधारे, गणेशपूर.

फेकण्याऐवजी त्या राखेचा उपयोग त्यांनी वृक्षारोपण किंवा शेतात टाकण्यासाठी केला. शिवाय वृक्षारोपणासाठी मोठमोठे गड्डे खणून त्या प्रत्येक खड्ड्यातही राख टाकली अंधारे परिवाराने दिलेला हा वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे