जाफराबाद तालुक्यातील जवखेडा येथील, श्री राम चरित्र चिंतन कथेला भाविकांचा मोठा प्रतिसाद ,. शिवभक्त परायण भाऊ पाटील यांचे रसाळ वाणीतून चिंतन कथा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील प्रसिद्ध जनेश्वर महादेव मंदिर संस्थान, जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम तर्फे आयोजित श्रीराम चरित्र चिंतन कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास, अधिकमासाच्या पुण्य पर्व काळामध्ये श्री राम चरित्र कथेचे आयोजन वरील संस्थांमार्फत करण्यात आले. कथेचे निरूपण प्रसिद्ध कथाकार तथा निरूपणकार, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे पट्ट शिष्य, शिवभक्त,हरिभक्त परायण भाऊ पाटील महाराज अभ्यासपूर्ण आणि चरित्र कथेचे चिंतन करीत आहे. प्रभू रामचंद्रांचा आदर्श जीवनवाद, त्यांचे धर्मावरची धर्मनिष्ठा, कर्तव्यातील कर्तव्यपरायणता, आणि समाज हित समजावून सांगत असताना आजच्या कलियुगातील घडामोडीतील सर्वच विषयांवर प्रकाश टाकताना भाऊ पाटील दिसत आहे. खते दरम्यान श्री राम जन्म कथा, वनवास, भक्ती, त्याग, कर्तव्यनिष्ठा, रामराज्याची संकल्पना यावर सखोल विवेचन चालू आहे.. लोकांनी संस्काराची शिदोरी सोबत घेतानाच समाजसेवा, सदाचार जोपासावा यावरही ते भर देत आहे. या कथेच्या माध्यमातून युवकांबद्दलही चांगले संस्कार आणि त्यात प्रेरणा या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा समजावून सांगत आहे. धर्मनिष्ठा समजून सांगत असताना समाजातील एकता कशी टिकून राहील यावरही ते भाष्य करीत आहे. या सोहळ्याला परमपूज्य माधवगिरी महाराज यांच्या आशीर्वाद असून या सोहळ्यासाठी टेंभुर्णी गोदनखेडा आश्रमाचे परमपूज्य महेश गिरी महाराज यांच्या विषयी उपस्थितीमध्ये, तसेच जनेश्वर महादेव मंदिर संस्थांचे ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रेरणेतून श्रीराम चरित्र कथा संपन्न होत आहे. या श्रीराम चरित्र कथा मध्ये भाविकांना ज्ञानाबरोबर, महाप्रसादाचा सुद्धा लाभ मिळत असून या सर्व संधीचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे.



