pub-7425537887339079
ब्रेकिंग

नगरपंचायत न होताच, ग्रामपंचायत च्या निवडणुकीचे लागले वेध — जनार्दन झोरे,

नगरपंचायत साठी गावकऱ्यांनाच घेऊन आवर्जून प्रयत्न करणार, १२ जून रोजी विशेष सभा

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10

जालना जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियेसाठी १२ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असून, १७ऐवजी १८ सदस्य असणार आहेत. टेंभुर्णीकरांनी गावाची नगरपंचायत व्हावी, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप, शासकीय दप्तरदिरंगाई आणि सत्ताधारी पक्षाच्या स्वार्थामुळे नगरपंचायतीचे स्वप्न भंग पावल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. या राजकीय हस्तक्षेपावर स्थानिक पुढाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. पैशांची देवाणघेवाण आणि बाहेरच्या हस्तक्षेपाने गावातील एकोपा बिघडून गटतट निर्माण होण्याची भीती राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे. नगरपंचायत न होताच ग्रामपंचायत च्या आरक्षण निवडीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणुका येतात आणि जातात, मात्र गावातील शांतता भंग पावून मतभेद होऊ नयेत, यासाठी टेंभुर्णीकरांनी आतापर्यंतचा इतिहास जपला आहे. गेल्या निवडणुकीत

——————————————————————-

लढा उभारणार नगरपंचायत व्हावी, हा सर्व गावकऱ्यांचा ठराव होता. परंतु, शासकीय अडचणी आणि राजकीय अडकाठीमुळे आम्ही सध्या हा निर्णय शांतपणे स्वीकारला आहे. यापुढे या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर लढा उभा करू, सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन नगरपंचायत चे धोरण राबवण्यासाठी आम्ही गावकरी आणि गावकऱ्यांतर्फेच लढा उभारल्या जाऊ जाणार. माझ्यासाठी गावकऱ्यांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून, गावच्या विकासासाठी शहरीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अमाप निधी येत असतो तो निधी गावकऱ्यांसाठीच खर्च झाला पाहिजे यावर आमची भूमिका ठाम आहे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आता झेंडा घेणार गावकऱ्यांसाठी काहीही करायला तयार आहे. नुसते विकासाचे झेंडे हातात घेण्यापेक्षा विकास करून दाखवणार ही माझी भूमिका आहे असे जनार्दन झोरे यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.राजकीय रंग लागल्याने झालेले सामाजिक नुकसान पाहता, यंदा मनभेद होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागेल, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. जर यावेळी नगरपंचायत झाली नाही, तर शासनाकडे पुन् हा दाद मागण्यासाठी आणि योग्य निर्णय

—————————————————————–

राजकारण फक्त निवडणुकीपुरते आम्ही सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करत असलो तरी, नगरपंचायत झाली असती तर आम्हालाही आनंदच झाला असता. मात्र, यात नेमकी कोणाची अडकाठी आली, हे कळू शकले नाही. आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरते मर्यादित ठेवतो, निवडणूक संपली की सर्वजण पुन्हा मित्र म्हणूनच राहतो. एक सामाजिक कार्यकर्ता

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे