pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रीडा स्पर्धा : क्रीडा शिक्षकांची 23 ऑगस्टला बैठक

0 4 0 4 6 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.21

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांच्या विद्यमानाने सन 2023-24 वर्षातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासंदर्भात बुधवार दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रिडा अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका क्रिडा अधिकारी, तालुका क्रीडा संयोजकांच्या उपस्थितीत जालना तालुक्यातील सर्व शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, सर्व माध्यमांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक असलेल्या शाळा मधील क्रीडा शिक्षकांची, तसेच क्रीडा प्रेमी शिक्षकांची बैठक जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालना, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 6 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे