कोविड -19 संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून नवीन निर्देश जारी

जालना/भगवान धनगे:दि.1
महाराष्ट्र राज्यात कोविड-19 विषाणू चे संक्रमण कमी होत असल्याने दि.31 मार्च 2022 च्या शासन आदेशान्वये, या साथरोग संदर्भाने लावण्यात आलेले प्रतिबंध उठवणे बाबत निर्देश दिले असुन,
दिनांक 22 मार्च, 2022 रोजी केंद्रिय गृह सचिवांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कोविडच्या अनुषंगाने लावण्यात आलेले निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेतला आहे.
तसेच राज्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी जारी करण्यात आलेले आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे हटविण्याचे आदेशा दिले आहे. दिनांक 23 मार्च 2022 रोजी.केंद्रीय सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार गेल्या दोन महिन्यांत कोविड-19
प्रकरणांच्या संख्येत झालेली सतत आणि लक्षणीय घट लक्षात घेऊन मापदंडांवर आधारित, पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यासाठी एक विस्तृत फ्रेमवर्क, टेस्ट पॉझिटिव्हिटी आणि बेड ॲक्युपन्सीचे अवलंब करणे आवश्यक आहे आणि नवीन प्रकरणांचा उदय, केस पॉझिटिव्ह, प्रभावित लोकसंख्या, रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची तयारी इत्यादी घटकांवर आधारित निर्बंध मागे घेण्याबाबत राज्यांनी निर्णय घ्यावेत.
वरीलप्रमाणे प्राप्त निर्देशाचे अनुषंगाने कोविड-19 करीता लागू करण्यात आलेले निर्बध उठविण्याबाबत राज्य शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, केशव नेटके, शासनाच्या प्राप्त निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग संदर्भानुसार खालीलप्रमाणे आदेश देत आहे,
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अंतर्गत यापुर्वीचे सर्व प्रतिबंधात्मक आदेश याद्वारे दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी 12.00 वाजेपासुन संपुष्टात आणण्यात येत आहेत.
वर उल्लेख
केलेल्या केंद्र शासनाच्या दोन्ही पत्रांमध्ये असलेल्या सर्व निर्देशांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कोविड व्यवस्थापन आणि नियंत्रणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे.
सर्व नागरिक, आस्थापना आणि संस्थांना मार्गदर्शन करण्यात येते की त्यांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादींसह कोविड योग्य वर्तनाचे पालन करणे सुरू ठेवावे कारण हेच कोविड पासून नागरीकांच्या तसेच समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठे संरक्षण आहे.
विशेषत: कोविड व्यवस्थापन आणि नियंत्रणाशी संबंधित जिल्हयातील सर्व यंत्रणांनी सदर महामारीच्या प्रादुर्भावाच्या विविध आयामांबद्दल जागरुक राहावे, जसे की दररोज दाखल होणा-या कोविड रुग्णांची संख्या, सक्रिय प्रकरणांची संख्या, टेस्ट पॉझिटिव्हिटी दर तसेच वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयांमधील बेड ॲक्युपन्सी जर केंद्रशासनाच्या वरील नमुद पत्रातील निकषांचे पुनरुत्थान सूचित करणारा कोणताही ट्रेंड लक्षात आला तर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ अवगत करावे त्यामुळे अगदी सुरुवातीच्या स्थितीत पुनरुत्थान नियंत्रित करण्यासाठी योग्य कारवाई सुरू करता येईल.
कोविड व्यवस्थापन आणि नियंत्रणाशी संबंधित जिल्हयातील सर्व यंत्रणांनीसर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी IEC उपक्रमांसह आवश्यक ती सर्व पावले उचलणे सुरू ठेवण्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आदेशीत केले आहे.