Uncategorised

येत्या काळात हा चेहरा जिल्ह्यात राष्ट्रवादी नावाचं झंझावाती वादळ निर्माण करणार यात काही शंका नाही – मुकूंद गोंडे.

वडवणी/अंकुश गवळी:दि.7

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक जिल्हाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह भैय्या सोळंके साहेब हे नाव सध्या बीड जिल्ह्याच्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण कारण भैय्यांची विकास कामे , काम करण्याची पद्धत , बोलण्याची पद्धत , प्रशासनावर असलेली पकड आणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे युवकांना वाईट व्यसनाधीन न करता युवकांना व्यावसायामध्ये उतरण्यासाठी प्रोत्साहित करतात व वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करतात. आणी मतदार संघातच नव्हे तर जिल्ह्या मध्ये युवकांची मोठी फळी निर्माण करणारं हे लोकप्रिय नेतृत्व ठरलेले आहेत जयसिंह भैय्या सोळंके हे बाकी सारखे निवडणूक आली की मतदार संघात फिरायचं दौरे करायचे असं न करता दररोज जनसंपर्कात असतात कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात ते पुढे असतात लहान असो किंवा थोर सर्वाना आपलासा वाटणारा हा भैय्या आज जिल्ह्याच्या राजकारणावर छाप सोडत आहे आणी जिल्ह्याचं लक्ष असणारी आणी शक्य नसलेली वडवणी नगरपंचायत निवडणुक या युवक नेतृत्वानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ताब्यात आणुन दिली व सध्या कुठलीही निवडणूक नसताना प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेत आहेत व मोठ्या प्रमाणात युवकांना संघटित करण्याचं काम भैय्या सध्या करत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष या पदाला साजेल असा पक्षाने जिल्हाध्यक्ष दिला याचा मनस्वी आनंद आहे आणी येत्या काळात हा चेहरा माजलगाव मतदार संघात नव्हे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वादळ निर्माण करणार यात काही शंका नाही असे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मुकूंद भैय्या यांच्या त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!