बजाजनगर केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा.

औरंगाबाद/आनिल वाढोणकर:दि.7
जागतिक महिला दिनानिमित्त प.पू.गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत आज रविवार दिनांक- ६ मार्च २०२२ रोजी बजाजनगर केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य, शिक्षण तसेच उद्योग क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
सेवा विभागातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित कर्तबगार महिलांना गर्भसंस्कार, बालसंस्कार पाठ्यक्रम, ज्ञानदान,सणवार व्रत वैकल्य असे ग्रंथ साहित्य देत प.पु.गुरुमाऊलींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रसंगी आरोग्य सेविका, फुल विक्रेता,फळ विक्रेता महिलांच्या कार्याचा गौरव करत अशा महिलांचा देखील सन्मान करण्यात आला.
डॉक्टर सौ.नंदिनी लहाने मँडम(सौंदर्य व स्रीरोग तज्ञ,धन्वंतरी हाँस्पिटल,बजाजनगर) यांनी स्रीरोग तथा गर्भसंस्कार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.शिक्षण क्षेत्रातील सौ.रेवती काजळे मँडम (संस्थापिका, शांताई पब्लिक स्कूल, वडगाव को.,बजाजनगर),सौ.अर्चना जाधव मँडम ( प्राचार्य, तनवाणी ज्युनिअर काँलेज,बजाजनगर)व सौ.वंदना अपार मँडम (संस्थापिका, रायझिंग इंग्लिश स्कूल, बजाजनगर) यांनी शिशुसंस्कार,बालसंस्कार तसेच बालक-पालक संबंध व टिव्ही/मोबाईल एक व्यसन या विषयावर आपले विचार मांडले,तर उद्योग क्षेत्रासंबंधी सौ.श्रुती चामले मँडम (उद्योजिका, सुरज ब्लो प्लास्ट प्रा.लि.औरंगाबाद) यांनी एक महिला देखील यशस्वी उद्योजक बनू शकते हे सांगत गरज फक्त इच्छाशक्तीची आहे यावर आपले विचार मांडले.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा प्रबोधन विभागातील युवकांनी प्रयत्न केले.