Uncategorised

हदगाव येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक पाच हे कार्यालय स्थलांतरित करू नये , ना. जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे निवेदन.

हदगाव/प्रभाकर डुरके:दि.7

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज हदगाव चे उपविभागीय अधिकारी श तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे जल संपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष यांना निवेदन देऊन हदगाव येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प ५ हे कार्यालय वरिष्ठ अधिकारी हदगाव येथे स्थलांतरित करण्याचे कारस्थान करत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील काळात अडचणी निर्माण होतील, म्हणून ना जयंतराव पाटील यांना विनंती करून हदगाव येथील कार्यालय स्थलांतरीत करू नये, असे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले की, गोदावरी पाट बंधारे विकास महामंडल अंतर्गत कार्यरत कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ हदगाव जिल्हा नांदेड हे कार्यालय हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील कयाधू शाखा कालव्याची कामे पार पाडून तालुक्यातील सिंचन वाढवण्या साठी ,जून १९८८ साली हदगाव येथे आखाडा बाळापूर येथून स्थलांतरीत करण्यात आले होते, या कार्यालयाकडे हदगाव , हिमायतनगर, व उमरखेड तालुक्यातील सिंच नाची कामे सुरू असून या विभागाकडे सहस्त्रकुंड जल विद्युत प्र कल्पाचे देखील कामे सुरू आहेत या विभागात जवळपास ३० कोटीची कामे सुरू असून भू संपादनाची देखील जवळ पास २० कोटीची प्रकरणे प्रलंबित आहेत सहत्रकुंड जल विद्युत प्र कल्प जवळ पास रू ३०० कोटीचा असून, या मतदार संघात पैनगंगा नदीवर जवळपास एक हजार चारशे कोटी रुपयांची उच्च पातळी बंधारे बांधण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे,इतकी कामे असताना काही अधिकाऱ्यांचे मन मानी मुळे हा विभाग नांदेड येथे स्थलांतरित करण्या बाबत चा प्रस्ताव मंत्रालय मुंबई येथे सादर करण्यात आला आहे, जर सदरील कार्यालय जर नांदेड येथे स्थलांतरित झाले तर या भागातील शेतकरी बांधवांवर मोठा अन्याय होऊन कामावर सिंचन व भू संपादन प्रक्रिया वर दुष्परिणाम होईल, असी निवेदनात विनंती करण्यात आली आहे.

हदगाव येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक ५ हे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित न करता हदगाव येथे च ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे,या निवेदन सादर करताना, वसंतराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष हदगाव , जिल्हा परिषद नांदेडचे माजी जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव, निर्मल पाटील तालंगकर, प्रा राजेश राऊत,अभिजीत रूद्रकंठवार, श्याम लाहोटी, गौतम नरवाडे, सलमान खान, के.डी.पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!