महाराष्ट्र

आपलं गाव आपली जबाबदारी या माध्यमातून होणार कोरोना हद्दपार:सरपंच पाखरे

◆उटवद येथे ग्राम दक्षता समिती स्थापन!

विरेगाव/प्रतिनिधी:दि.2

महाराष्ट्रात कोविड ने मोठ्या प्रमाणात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे गावागावात कोविड आपले रौद्ररूप धारण करत आहे, त्याच बरोबर रुग्णांचा मृत्यूदर ही वाढत आहे आपलं गाव आपली जबाबदारी क्षमतेने पण माझे कुटुंब माझी जबाबदारी या नात्याने स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

आपल्या गावातील कोविड सदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या उपक्रमासाठी मा. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्या पत्रकाद्वारे उटवद येथे ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली .समितीचे अध्यक्ष सरपंच श्री के. एस. पाखरे, सचिव ग्रामसेवक श्री एस. एम. जोशी, मुख्याध्यापक- श्री डी.पी.ढवळे ,श्री के.एल.पगारे, श्री यु.जी.बोंबले,कृषी सहाय्यक-श्रीमती एस.डी.वायाळ,तलाठी-श्री ए.आर. पाटील, बि.एल.ओ श्रीमती आर.ए.नरोडे, अंगणवाडी सेविका- श्रीमती विजयमाला शेळके, शारदा क्षीरसागर, सविता पावशे, आशा कार्यकर्ती- श्रीमती मीरा बोंबले, त्रिशला भुतेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक आशा कार्यकर्ती व अगंणवाडी सेविका यांना 80 कुटुंब देण्यात आले, व प्रत्येक व्यक्तीचे प्लस ऑक्सीमाईटर द्वारे ऑक्सीजन लेवल व थर्मल गण द्वारे तापमान चेक करण्यास सांगितले. इत्यादी प्रकारे योग्य विभागणी करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी मार्गदर्शन पर सरपंच पाखरे म्हणाले की कोरोना विषयी जनजागृती व मनातील भीती कमी करण महत्वाचं आहे. तसेच योग्य वेळी उपचार घेतला तर कोरोना आजारापासून व्यक्ती बरा होऊ शकतो, व्यक्तीने दुखणे अंगावर न काढता सर्दी, ताप, खोकला या सारखी लक्षने आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, नसता समितीला कळवावे तसेच RT-PCR तपासणी करून घ्यावी. याच बरोबर सर्व जनतेने कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे तसेच 100% लसीकरण करून घेण्याचे सरपंच पाखरे यांनी आवाहन केले, शेवटी कोरोना हरेल आणि गाव जिंकेल असेही ते म्हणाले यावेळी उपसरपंच परीक्षित शिंदे उपस्थित होते.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .