महाराष्ट्र

“माझ गाव माझी जवाबदारी”च्या माध्यमातून गावाच्या संरक्षणा साठी कोरोना योद्धे सज्ज-सरपंच वांजुळे “चितळी पुतळी येथे ग्राम दक्षता समिती स्थापन”!

विरेगाव/प्रतिनिधी:दि.29

शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या कोविडने ग्रामीन भागात म्हणजेच गावाकडे हातपाय पसरले आणि गावा गावात कारोनाचा कहर सुर झाला. त्यामुळे आज मितीला कारोनाचा संसर्ग फारच झपाट्याने होत आहे. रुग्नाबरोबरच मृत्यूदरही वाढत आहे. म्हणुनच माझ गाव माझी जवाबदारी”च्या माध्यमातून आपले कुटुंब आपली जवाबदारी या नात्याने स्वतः बरोबर आापल्या कुटुबाची काळजी घेण्याचे अवहान सरपंच वांजुळे यांनी केले.
आपल्या गावात प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी मा. जिल्हाधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्या पत्रकान्वये चितळी पुतळी येथे ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षा श्रीमती स्वप्ना राजेंद्र वांजुळे तर सचिव ग्रामसेविका श्रीमती अलका धांडे या असून मुख्याध्यापक श्री पी. डी. चव्हाण, जाधव एस. व्ही. सौ निर्मला बांदेकर, श्रीमती लांडगे, श्रीमती सोनलकर, श्री वाहुळे, श्रीमती नरंगले सदस्य आहेत. प्रतिबंधात्मक कार्यासाठी कोरोना पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली. चार अंगनवाडी सेवीका,दोन आशा सेविका व शिक्षकाच्या माध्यमातून गावातील कुटुंब विभाजन करुन प्रत्येक अंगणवाडी सेविका व आशा सेविकेकडे ७०ते ८० कुंटुब देण्यात आले. यावेळी श्री राजेंद्र वांजुळे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री राजेंद्र वांजुळे यांनी सांगीतले की गावात पर्यवेक्षकांच्या मदतीने व दक्षता समितीच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती, कोरोना संसर्गीत रुग्नाच्या संपर्कातील व्यक्ती यांचा शोध घेऊन वैयक्तिय उपाय आणि वैद्यकिय उपचार यासाठी जागृती केली जाणार आहे. काही लक्षणे आढळल्यास लगेच कोविड चाचणी करून उपचारासाठी संबंधितास प्रवृत्त केले जाईल.
त्याचप्रमाणे लसीकरण शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी अठरा वयावरील सर्वांचे सर्वेक्षण करून त्यांना लस घेण्यासाठी मदत केली जाणार आहे. गावकऱ्यांनी ही स्वतःची जवाबदारी म्हणुन ग्रा.पं.च्या वतीने मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आले असुन ते आपण रेग्युलर मास्क लावुनच गावत वावरले पाहीजे घरी गेल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ धुतले पाहिजेत
नियमित काळजी आणि संपूर्ण लसीकरण यातूनच कोविडचा प्रतिबंध होऊ शकतो असेही सरपंच यांनी सांगितले यासाठी समिती आणि पर्यवेक्षक कार्य करतील. गावकऱ्यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी पं.स.सदस्य प्रकाश टकले,उपसरपंच कल्याण उददुखे ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब लगडे, भीमराव लोढे यांची उपस्थीती होती.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .