महाराष्ट्र

आदर्श माता-पिता पुरस्कारासाठी 15 मार्च 2021 पर्यंत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे आवाहन

औरंगाबाद/प्रतिनिधी:दि.2

महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने एप्रिल मध्ये पार पडणाऱ्या कार्यगौरव सोहोळ्यात यशस्वी स्री-पुरुषाच्या आईसाठी~ *राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार* तसेच वडींसाठी~ *राज्यस्तरीय आदर्श पिता पुरस्कार* तसेच आई व वडिल या दोघांसाठी *राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार* देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेञातील कर्तृत्वसंपन्न मान्यवरांचा गौरव करण्यात येतो.प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सहकार,वैद्यकीय, महिला,कला , क्रिडा , साहित्य , पर्यावरण , उद्योग,कृषी,प्रशासकीय ,पत्रकारिता आदी क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्त्री- पुरुष तसेच संस्थांना अप्रतिम सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ,गौरव विशेषांक देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे .तरी इच्छुकांनी फॉर्मसाठी आपले नाव पत्ता सविस्तर कळविताच नामांकन फॉर्म पाठवण्यात येईल. ई मेलवर मागणी केल्यास मेलवरही नामांकन फाॅर्म पाठवून देण्यात येईल.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांचेकडे मागणी केल्यासही सदर नामांकन फॉर्म मिळू शकेल.परिपूर्ण माहितीसह नामांकन फॉर्म पाठवण्याची अंतीम तारीख 15 मार्च 2021 पर्यंत असल्याची माहिती संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर, संघाचे राज्य प्रमुख पदाधिकारी सागर पाटील,विनोद वर्मा,बाबासाहेब राशिनकर,डॉ.सुनील भावसार, राजेश जोष्टे, सचिन बैरागी, संजय नवले,शेखर सुर्यवंशी , शिरीष कुलकर्णी, प्रकाश वंजोळे, प्रशांत लाड ,आण्णासाहेब कोळी, प्रतापराव शिंदे ,महेश मोटे,प्रा.किरण जाधव, अनिल उपाध्ये,सोमनाथ पाटील, आदींनी प्रसिद्धी पञकाव्दारे दिली आहे.अधिक माहितीसाठी पुढील फोनवर 9422420611 किंवा
7066731503 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वेब~www.maharashtrapatrakar.com

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .