महाराष्ट्र

आज वडवणीत नगराध्यक्षा सौ.मंगलताई मुंडे यांच्या वतीने हळदी-कुंकवाचा स्नेहमिलन कार्यक्रम.

वडवणी/प्रतिनिधी:दि.18

वडवणी नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे यांच्या वतीने आज मंगळवार दि.१९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ठीक ४ वाजता मुंडे निवास, जिनिंग परिसर, बीड-परळी हायवे, वडवणी याठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा व तिळगुळाचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी शहरातील सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मकर संक्रांतीचे वाण, सुवासिनींना मान, दिवस मानाचा, सौभाग्याचा असा हा महिलांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांती सणाला विशेष असे महत्त्व आहे. या मकर संक्रांतीचे औचित्य साधत वडवणी नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा तथा वडवणी नगरीच्या प्रथम नागरिक सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे यांच्यावतीने आज मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजता यावेळेत नगराध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या मुंडे निवास, गजानन जिनिंग परिसर, बीड-परळी हायवे, वडवणी याठिकाणी मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकवाचा तसेच तिळगुळाचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी वडवणी शहरातील सर्व महिला भगिनींनी अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक नगराध्यक्ष सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे, सौ.किसना बाबासाहेब मुंडे, सौ.अनुसया रमेश मुंडे, सौ.सुनिता दिलीप मुंडे, सौ.संगिता कैलास मुंडे, सौ.सत्यभामा रविंद्र मुंडे, सौ.मिनाक्षी महारुद्र मुंडे, सौ.आशा योगेंद्र मुंडे, सौ.राजश्री अरुण मुंडे व समस्त मुंडे परिवार यांनी केले आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .