pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी सैनिकांना कारगील विजय दिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण करण्याचे आवाहन  

0 1 7 3 7 3

जालना/प्रतिनिधी,दि. 24

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील माजी सैनिकांनी गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहभागाने बुधवार      दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुचनेनूसार जालना जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये जोश व त्यांची त्यांच्या गावामधील प्रशासनासोबत सलोख्याची भावना वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने गावपातळीवर ग्रामपंचायत प्रशासन व माजी सैनिक यांच्या सहभागाने कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे असे कळविले आहे. तरी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आपापल्या ग्रामपंचायतीसह वृक्षारोपण करुन  वृक्षारोपण कार्यक्रमाच्या छायाचित्रासह अहवाल माजी सैनिकांच्या नावासह व सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 27 जुलै 2023  पर्यंत सादर करावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन गावातील माजी सैनिक समुहाला रोख पारीतोषिक देण्यात येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे