pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा काँग्रेस सेवादलाचे “रवि मिलन” व जनसंपर्क अभियानातून महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांनी केली मोदि सरकारच्या खोट्या घोषणांची पोलखोल.

0 1 7 3 8 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०. ३० वाजता काँग्रेस कार्यालय उरण येथे
सेवादलचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई व प्रदेश सेवादलचे अध्यक्ष विलास औताड़े यांच्या आदेशानुसार व रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष कमलाकर घरत यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर,महाराष्ट्र राष्ट्रध्वज प्रभारी प्रमोद कदम,तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत “रवि मिलन” कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रस्तावना रायगड जिल्हा सेवा दलचे अध्यक्ष कमलाकर घरत यांनी केली.प्रस्तावना करताना देशातील जनतेला अच्छे दिन आणि अनेक खोटे आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला दहा वर्षे होत असून या दहा वर्षात फक्त खोटे बोल रेटून बोल असे फक्त बोलबच्चन प्रमाणे बाता मारणे सुरु आहे. कामाच्या नावाने बोंबाबोंब आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. मोदीजी क्या हुआ तेरा वादा असेच म्हणावे लागेल.असे कमलाकर घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

रायगड जिल्हा काँग्रेस सेवादलाचे “रवि मिलन” व जनसंपर्क अभियानातून महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांनी मोदि सरकारच्या खोट्या घोषणांची यावेळी पोलखोल केली. व मोदी सरकार, केंद्र सरकार खोटी आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.रवि मिलन व जनसंपर्क अभियान सर्वत्र मोठया प्रमाणात राबवा व केंद्र व मोदी सरकारचे खरा चेहरा सर्वांसमोर आणा असे आवाहन त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्र सेवादलच्या वतीने राज्यभरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी “रवि मिलन” जनसंपर्क अभियान उरण तालुका काँग्रेस ऑफिस मध्ये राबविन्यात आला. सदर सभेत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश सेवादल चे उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर यांच्या हस्ते उरण तालुक्यातील महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. नंतर नवीन कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.दीपक ठाकूर सेवा दल रायगड जिल्हा उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर पाटील सेवा दल रायगड जिल्हा सरचिटणीस, रमेश पाटील जासई विभागीय सेवा दल अध्यक्ष, सुनील काटे उरण तालुका सेवादल उपाध्यक्ष, वंदना म्हात्रे जासई विभागीय सेवा दल अध्यक्ष,जी डी पाटील
महालन विभाग अध्यक्ष, प्रीती पाटील चाणजे विभागीय अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.सदर कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. उरण तालुका सेवादलचे अध्यक्ष गोपीनाथ मांडलेकर , केगाव विभागीय अध्यक्ष सदानंद पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत, रायगड जिल्हा इंटक संघटनेचे अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका शहराध्यक्ष प्रकाश पाटील, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संध्या दीपक ठाकूर, भेंडखळ गावचे उपसरपंच दीपक ठाकूर, केगाव विभागीय अध्यक्ष रेखा धनश्री, वंदना चव्हाण , वंदना म्हात्रे , सुनील काटे यांच्या उपस्थितीत रवी मिलन जनसंपर्क अभियानचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे