प्रा.रमेश मतकर पहिलवान प्रविण देवकर यांनी वाचवीले एका हरणाचे प्राण.

वैजापूर/प्रतिनिधी:दि17
वैजापूर वरून महालगांव कडे येत असतांना आमचे मिञ रमेश मतकर आणि प्रविण देवकर , डुकरे मिस्तरी यांना भगूर फाटा येथे मोरे वस्ती येथे रोडच्या कडेला जखमी अवस्थेत एक गरोदर हरीण दिसून आले. त्यांनी तत्काळ मोरेवस्ती वरून पाणी आणले व त्या जखमी हरणे हरणाला पाणी पाजले व मुक्या प्राण्यावर दया करावी या वाक्याप्रमाणे त्यात प्रथमोपचार केला सकाळ वृत्तपञाचे महालगांव सर्कलचे पञकार बंडूआप्पा रासने यांना सम्पर्क करून वनविभागाचे आधिकारी चव्हाण साहेब यांना बोलावून घेतले व त्यानंतर त्या जखमी हरीणीला तत्काळ वैजापूर येथे नेऊन प्रथम उपचार करून त्या हरीणीचे प्राण वाचविले.
समाजकार्यात व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले प्राध्यापक रमेश मतकर व वैजापूर तालुक्यात नावाजलेले पैलवान प्रवीण दादा देवकर यांनी हे मोलाचे कार्य केल्याबद्दल त्यांना पंचक्रोशीतील त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे