जालना जिल्यात 16 जानेवारीला 8 ठिकाणी कोरोना लसीकरण

जालना/प्रतिनिधी:दि.13
16 जानेवारीला जालना जिल्ह्यात 8 ठिकाणी कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अर्चना भोसले यांनी माहिती दिलीय.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन काही औषध कंपन्यांनी लस बाजारात आणलीय. यापैकी सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक दोन कंपन्यांची लस उपलब्ध झाली.
केंद्र सरकार पाठवेल त्या कंपनीची लस आता १६ जानेवारीला राज्यातील ५११ ठिकाणी हे लसीकरण सुरु होतय. जालना जिल्ह्यातील तब्बल आठ ठिकाणांचा यात समावेश आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामीण रुग्णालय घनसावंगी, प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव यासह इतर चार ठिकाणी हे लसीकरण सुरु होणार आहे.यासाठी प्रत्येक केंद्रावर पाच जणांची एक प्रशिक्षीत टीम तयार करण्यात आलीय. त्यांच्याद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.