महाराष्ट्र

‘समाजमाध्यमांत माझ्या विरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे’-ना मुंढे.

बीड/प्रतिनिधी:दि.13

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर ना. मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे पोष्ट करत सदरचे आरोप पूर्ण पणे खोटे असल्याचे सांगत माझी बदनामी करण्या बरोबर ब्लॅकमेल करणारे आहेत, असा खुलासा केला आहे.काल दि. 11 पासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत.
सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे.माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे.

‘मुंडे म्हणाले,’

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती.सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे.
शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात.
माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close