आदर्श देवगाव येथील जि.प शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

वडवणी/प्रतिनिधी:दि.12
वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श देवगाव, याठिकाणी सकाळी ठीक दहा वाजता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गाढवे मॅडम यांनी पुष्पहार अर्पण करून केले, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील सुरवशे, तर उपाध्यक्ष सिद्धेश्वर गवळी, तसेच आदर्श गावचे सरपंच मुकुंद सुरवशे, ग्रामसेवक आयुब पठाण सर,आदर्श देवगाव चे युवक वडवणी तालुका बीड हॅलो रिपोर्टर पत्रकार अंकुश गवळी, यांची उपस्थिती होती या वेळी शाळेतील शिक्षकवृंद आणि गावातील नागरिक यावेळी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,