ग्राम पंचायतची सत्ता तरुणाईच्या हातात द्या. पंढरीनाथ म्हस्के यांचे आवाहन

जालना/प्रतिनिधी:दि 11
येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षाचे पॅनल ही निवडणूक लढवीत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवयुवकांच्या हातात सत्ता सोपवावी व गावाचा विकास घडून आणावा, असे आवाहन मनसेचे जाफ्राबाद तालुका सचिव पंढरीनाथ म्हस्के यांनी केले. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रत्येक वॉर्डात नवतरुण देण्यात यावा कारण आजपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये, ना विकास ना कार्य कोणीच केले नाही. गोरगरीब जनतेचे घरकुलाचे पैसे वापस गेलेत, कोणाला शौचालय मिळाले नाही, तर बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये पाणीसुद्धा नाही अशा सर्व विकास कामांकरीता नवतरुणांना संधी दिल्यास नक्कीच गावाचा विकास होण्यास मदत होईल आज पर्यंत भावनेच्या भरात आपण पारंपरिक उमेदवारांनाच निवडून दिले आणि त्यांनी पाच वर्ष गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करून नवयुवकांना संधी द्यावी असे मनसेचे पंढरीनाथ म्हस्के यांनी आवाहन केले