pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पळसा केदारनाथ येथील विवाहासाठी सटवाजी पवार यांची सामाजिक बांधिलकी

रयत प्रतिष्ठानसह दानशूर व्यक्तीचा पुढाकार

0 1 7 3 6 7

हदगाव / प्रभाकर डुरके,दि.4

दिवसेंदिवस होत असलेली महागाई आणि परीस्थितीचा सामना करीत पतीच्या माघारी भावाच्या आश्रयाने त्यांच्या घरात राहून मिळेल ते काम करत उदरनिर्वाह चालवत कुटुंबातील मुला मुलींचे शिक्षण सुख दुःख करून मोठे करीत जुळलेल्या विवाहाला संसार उपयोगी साहित्य उपलब्ध करण्यासाठी अडचणीत आलेल्या हदगांव तालुक्यातील मौजे पळसा येथील अर्चना आनंदराव वाघमारे व केदारनाथ येथील महानंदा आनंदराव ढोले या दोन्ही गावातील कुटुंब हक्काचा निवारा ही उभा करु न शकलेल्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबातील विवाहासाठी आपण आपले कर्तव्य पार समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेल्या दोन वर्षांपासून गरजु कुटुंबासाठी आशेचा किरण ठरलेल्या हदगांव येथील विवेकानंद प्राथमिक शाळेत सहशिक्षीक म्हणून काम करत असलेले शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परीषद हदगांव तालुका अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर यांनी पुढाकार घेत स्वतः भरीव योगदान देत त्यांनी आपल्या मित्र मंडळीच्या माध्यमातून गरजुंपर्यंत मदतीसाठी पोहचण्यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करीत सुरू केलेल्या रयत प्रतिष्ठान व हदगाव शहरातील राजुजी पांडे व दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या व परीस्थिती मुळे संसार उपयोगी साहित्य घेऊ न शकलेल्या पळसा व केदारनाथ येथील दोन विवाहासाठी हिरव्या मांडवात संसार उपयोगी सर्व साहित्य कन्यादान रुपी देत सामाजिक बांधिलकी जोपासली. निस्वार्थी पणाने केलेल्या या कार्याचे हदगांव तालुक्यात कौतुक केले जात आहे.
यावेळी रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सहशिक्षक सटवाजी पवार जवळगावकर, हदगांव येथील सामाजिक कार्यकर्ते राजुजी पांडे , पत्रकार बंडु माटाळकर,जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक सचिव हरिश्चंद्र चिल्लोरे, जाधव पारवेकर, दिपक पाटील पळसेकर, केदारनाथ येथील सरपंच तानाजी गायकवाड, पत्रकार भगवान कदम वाळकीकर, गजानन अंनतवार कवानकर, सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे पळसेकर, प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा, संदिप दहीभाते, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे