महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा न दिल्यास तिव्र आंदोलन करणार- मच्छिंद्र झाटे.

वडवणी/ प्रतिनिधी:दि.11
गेल्या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या पावसाने तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते यामध्ये शेतकऱ्यांनी या पिकांचे पिक विमा हि शासनमान्य कंपनीकडे भरला होता परंतु ज्या शेतकऱ्यांनी आँनलाईन तक्रार केली अशा फक्त 622 शेतकऱ्यांनाच पिक विमा मंजूर होऊन पिक विमा रक्कम देण्यात आली आहे तरी यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी या जाचक अटी मुळे पिकांचे नुकसान होऊनही पिक विम्या पासून वंचित राहणार आहेत तरी पिक विमा कंपनीने विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा पैसे द्यावेत नसता शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी प.स.सदस्य मच्छिंद्र बप्पा झाटे यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी सन 2020 मध्ये सतत जुन ते आँक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिके असणारे कापूस, सोयाबीन, बाजरी, तुर यासह इतर पिके हे जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवक्रपेने हिरावून घेतला होती त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले होते यामध्ये अतिवृष्टीने तालुक्यातील 24970 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले होते यामध्ये 31551 शेतकऱ्यांनी विमा कंपनी कडे पिक विमा भरलेला होता यामध्ये विमा कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासात आँनलाईन तक्रार देण्यास सांगितले होते यामध्ये फक्त 622 शेतकऱ्यांनी आँनलाईन तक्रार दिल्याने कंपनीने फक्त याच 622 शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करून पैसे दिले आहेत तरी तालुक्यातील हजारो शेतकरी हे या जाचक अटीमुळे पिक नुकसान होऊनही पिक विम्या पासून वंचित राहणार आहेत तरी पिक विमा कंपनी ही विमा मिळणार का नाही हेही शेतकऱ्यांना स्पष्ट पणे सांगण्यास तयार नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊनही पिक विमा मिळत नसल्याने विमा कंपनी शेतकऱ्यांवर जाणून बुजुन एक प्रकारे अन्यायच करत आहे तरी तालुक्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करून पैसे बँक खात्यावर द्यावेत नसता शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे माजी प.स.सदस्य मच्छिंद्र झाटे यांनी दिला आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close