काजळा येथे आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जालना /प्रतिनिधी :दि.18
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर रामकिशन गरड वय 31यांनी कर्जाच्या वाढत्या बोजाला कंटाळून व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे.थोडक्यात माहिती अशी की गाडीचा हप्ता,मायक्रो फायनान्सचे कर्ज, बी बियाण्यासाठी खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज,त्यातच राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज, ई. बँकेचा तगादा,यातच भर म्हणजे लॉक डाऊन मुळे हाताला काम नव्हते.त्यामुळे सदरील व्यक्तीला दारूचे व्यसन लागुन पोट कसे भरायचे? यामुळे तो सतत तणावात असायचा.तो सतत कर्जाची चिंता करायचा यातच दिनांक 17. 12. 2020 गुरुवारी भल्या पहाटे तीनच्या दरम्यान मुला बायकोला धमकावून आपल्या घराच्या बाजूला घरी पाठवून राहत्या घराच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्याच्या पश्चात बायको
भाऊ, भावजाई,2 बहीणी,मुलगा प्रथमेश वय 7 वर्ष मुलगी प्रांजली वय 14 वर्षे असा परिवार आहे.