महाराष्ट्र

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन करावे लागते शेतात काम.

अंबड/प्रतिनिधी: दि.26

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषी क्षेत्रासाठी विज ही अत्यावश्यक आहेत. शेतकऱ्यांना शेती मधून आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतकऱ्यांची ती मूलभूत गरज आहे. परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा मनस्ताप सहन करावा लागतो. विज जोडणी पासून ते ऐन बहरात असणाऱ्या पिकांना पाणी देते वेळेस जास्त प्रमाणात केले जाणारे लोड सेटिंग मुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस येतो. शेतकऱ्यांना विजेच्या वेळेनुसारच रात्री-अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची वेळ येते. यामुळे अनेक वेळा अपघातही घडत असतात.
महावितरणचा गलथान कारभारा मुळे शेतकऱ्यांचा, परिवारातील सदस्यांच्या किंवा पशुधनाच्या जीवावर बेतू शकते. अशी गंभीर परिस्थिती अंबड शिवारात असणाऱ्या सर्वे नंबर चारशे वीस मधील शेतकरी बाबुराव खरात यांच्या शेतात पाहावयास मिळते. विद्युत पुरवठा करणारे विद्युत पोल मधील तारा ज्या विद्युत प्रवाहित आहेत पूर्णतः जमिनीला खेटूनच लोंबकळत आहेत. यामुळे नकळतपणे शेतात काम करणाऱ्या महिला, मजूर, पशू या तारांच्या संपर्कात आल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. जालना जिल्ह्यामध्ये अवघ्या काही दिवसापूर्वी दोन ठिकाणी पाच शेतकऱ्यांचा विजेचा धक्का बसलेले दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि मग या संबंधित शेतामध्ये असणाऱ्या विद्युत तारा मुळे महावितरण जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close