महाराष्ट्र

२६नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा.

जालना/प्रतिनिधी:दि.25


आघाडी शासनाच्या निष्क्रिय काळात वीज मंडळाचा कारभार भोंगळा झालेला आहे याअगोदरच आस्मानी संकटाने शेतकरी अडचणीत आला असतांना शासनाच्या कारभाराने पुरता नागविला जात आहे. लॉकडाऊन काळात मनमानी वीजबिल देऊन अख्खा महाराष्ट्र लुटण्याचे काम महाविज वितरण कंपनीच्या माध्यमातून शासनाने केले आहे. घरगुती वीज ग्राहकांना अव्वाची सव्वा वीजबिले देण्यात आली आहेत त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपांना सुरळीत व वेळेवर वीज उपलब्ध होत नाही, विद्युत ट्रांसफार्मर डी.पी. मिळत नाही. डी.पी. वारंवार नादुरुस्त होते, त्यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. अशा या निष्क्रिय आघाडी शासनाचा निषेध करण्यासाठी व लॉकडाउन काळातील विज बिल माफ करण्यासाठी मनसेच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोज सकाळी ११वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या धडक मोर्चा मध्ये सर्व शेतकरी बंधू व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आकारलेले भरमसाठ विद्युत वाढीव बिला संबंधी व कोविड-१९ लॉकडाउन काळातील बिल माफ करण्यासाठी राज साहेब ठाकरे महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या आव्हानाला सर्व नागरिक बंधू व भगिनी तरुण मित्रानी या सरकारच्या विरोधात मोर्चामध्ये सामील व्हावे येताना मास्क लावूनच व सोशल डिस्टंनसिंग अंतर ठेवण्याचे ठरवून महाराष्ट्रातील जनतेसाठी आपली उपस्थिती हवी आहे. गावागावातून व सर्व शहरातून कोविड-१९ नियमाचे पालन करून हजारोच्या संख्येने न चुकता जालना येथे यावे,आमदार राजु दादा पाटील, अभिजित पानसे नेते.अशोक तावरे राज्य उपाध्यक्ष, सुमित खांभेकर, मनसे नेते शेख जावेद भाई यांच्या मार्गदर्शनात मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळुंके, जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे असे आवाहन पंढरीनाथ म्हस्के जाफ्राबाद तालुका सचिव यांनी केले आहे यांच्यासमवेत जिल्ह्यातील व तालुक्यातील मनसे पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष या सर्व अंगीकृत मनसे संघटना महाराष्ट्र सैनिक बंधू-भगिनी यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघणार आहे

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close