महाराष्ट्र

ऐन हिवाळ्यातच नाथनगर येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती.

वडवणी/प्रतिनिधी :दि.21

माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील नाथनागर वस्तीवर असलेले दोन्ही हातपंप ऐन हिवळ्यातच दुरुस्तीविना बंद पडले आहेत त्यामुळे पाण्याविना नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. सदरील प्रकरणाची माहिती ग्रामपंचायत लोणगाव व पंचायत समिती माजलगाव याना महिन्याभरापासून निवेदन देऊन सतत पाठपुरठा करून देखील ग्रामपंचायतीमार्फत वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.
हिवाळा चालू झाला असून दररोज विजेचा अनियमितपणा चालूच आहे. नाथनागर वस्तीवर दोन हातपंप असून दुरुस्ती नसल्या कारणाने दोन्ही हातपंप महिन्याभरापासून बंद आहेत. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करून आपला जीव भांड्यात टाकून पाणी आणावं लागत आहे. सदरील निवेदन देऊन देखील झोपेचं सोंग करणाऱ्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाला अजूनही जाग कधी येणार अशी भावना नागरिक प्रकट करीत आहेत. जर लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर उपोषणाचा इशारा नागरिकानी दिला आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close