महाराष्ट्र

शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा निर्घृण खून.

मांडव्यातील घटना

जालना/प्रतिनिधी:दि.20

जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील शेतकरी रतन गिरजाजी खंडाळे (65) आणि त्यांच्या पुतण्यामध्ये शेतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रतन खंडाळे हे शेतात जात असताना, त्यांना रस्त्यात अडवून दोन पुतण्यानी काठीने मारहाण केली.डोक्यात काठीचा मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पाठविला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून, दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close