महाराष्ट्र

येत्या बुधवार पासून सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू होणार!

जालना/प्रतिनिधी:दि.20

शेतकऱ्यांच्या घरात आलेल्या कापसास बाजारात कमी भाव मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी पुढाकार घेतला असून सी.सी.आय.च्या अधिकारी वृंदाची गुरूवारी (ता.19) आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन जालना व बदनापूर येथे तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गतवर्षी प्रमाणे यंदा ही अतिवृष्टी झाली. खरीप हंगामातील उडीद, मुग, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांनी महत कष्टाने जगवला.गत महिनाभरापासून कापसाची वेचणी सुरू असून आलेल्या कापसास  बाजारात कमी भाव मिळत  असल्याने शासकीय खरेदी केंद्र सुरू व्हावे हा व्यापक दृष्टिकोन ठेवून गतवर्षी प्रमाणेच महाराष्ट्रात सर्व प्रथम अर्जुनराव खोतकर यांनी सी. सी.आय.ची खरेदी केंद्र सुरू व्हावीत यासाठी पुढाकार घेत आज भारतीय कापूस निगम प्रा.लि.( सी सी आय) च्या अधिकारी वृंदाची बैठक घेऊन सूचना दिल्या.यावेळी बाजार समिती चे सचिव रजनीकांत इंगळे, सी . सी. आय. चे प्रतिनिधी हेमंत ठाकरे,श्री कोकाटे,पर्यवेक्षक मोहन राठोड,अनिल खंडाळे यांची उपस्थिती होती. बुधवारी (ता. २५) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कापूस मार्केट यार्ड येथे सकाळी ११.०० वा. आणि बदनापूर येथील उप बाजार पेठ येथे  सकाळी ११.३० कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close