महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील तिघा भावांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू.

जालना/प्रतिनिधी :दि.19

पळसखेडा पिंगळे ता.भोकरदन जिल्हा जालना येथील सख्खे भाऊ ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव वय 27,रामेश्वर अप्पासाहेब जाधव,वय24 तसेच लहान भाऊ सुनील अप्पासाहेब जाधव वय 16 हे तिघेही काल रात्री 9 वाजे दरम्यान शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असता रात्री विजेचा लपंडाव सुरू होता त्यामुळे एका भावंडाने विद्युत मोटार चालू करताना त्याला जोरदार विजेचा धक्का लागला व तो शेजारी असणाऱ्या विहिरीत कोसळला, हे पाहून तिथे असलेल्या भावंडांनी त्याला वाचवंण्यासाठी विहीरीत उड्या मारल्या मात्र विहिरीत अगोदरच विज उतरलेली होती त्यामुळे तिन्ही भावांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सुरक्षितता म्हणून ही दोघे गावी होते. ज्ञानेश्वर हा वडिलांना शेती कामात मदत करायचा अतिशय हळवा व प्रेमळ म्हणून त्याची गावात ओळख होती.
घटना बुधवारी चारच्या सुमास घडली आहे. घटनेनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा करून दिघा भावांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.रात्री उशिरा घटना घडल्यामुळे परिसरात कोणीही नसल्याने घटना समजण्यास उशीर झाला होता. घटनेची माहिती कळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह हसनाबादचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, सहायक फौजदार देशमुख, पोहेकाँ. विष्णू बुनगे, भापकर आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .