महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा.-परशुराम कुटे

बीड/प्रतिनिधी :दि.11

गेल्या दोन तीन महिने संपूर्ण महाराष्ट्र पावसाने खूप मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी आपली सर्व पुंजी शेतात घालतो बी-बियाणे, फवारणी वर्षभराचे शेतकऱ्यांना वर्षभर मेहनत करून कापूस,सोयाबीन, कांदा उत्पादक काढतो.त्याच पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा दिला होता परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नसून त्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीच्या काळाचा सामना करत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थोडाफार निघालेला कापूस घरातच आहे शासनाने आणखी खरेदी केंद्रे चालू केले नसून त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे काही दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपलेला असताना मात्र शेतकऱ्यांना अद्यापही शासनाने नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे दिपावली पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा करून शेतकऱ्यांची दीपावली गोड करावी. यावर्षी शेतकरी बांधव व खूप मोठ्या प्रमाणात सुलतानी संकटाला घेऊन ठेपलेले आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा करून त्यांना न्याय दयावा. असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे परशुराम कुटे यांनी म्हटले आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close