महाराष्ट्र

माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचा पिठ्ठी येथे विशेष सत्कार संपन्न.

बीड /प्रतिनिधी :दि.25

बहुजन हृदय सम्राट, व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा महादेवजी जानकर साहेब ,हे समाज संघटित करण्यासाठी, विशेष दौरे करीत आहेत. सामान्य कुटुंबातून, धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून, ते नेहमी तत्पर असतात. धनगर समाज हा भोळाभाबडा असल्यामुळे, त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रसंगी महादेव जानकर साहेब व मतकर साहेब यांचा पिठ्ठी येथे महेश भोंडवे यांच्या हस्ते विशेष सत्कार संपन्न झाला. यावेळी उपस्थित, युवा मल्हार सेनेचे बीड उपजिल्हाध्यक्ष मा. कल्पेश भोंडवे सर, तालुकाध्यक्ष मा .भागवत काळे, शिव अहिल्या शासन चे बीड जिल्हा अध्यक्ष मा .नितिन (भैय्या )भोंडवे ,कृषिसहाय्यक, दिलीप भोंडवे साहेब ,अक्षय कुडके सर (जिल्हा परिषद जालना) महावितरण कर्मचारी गणेश भोंडवे ,केशव भोंडवे ,शहादेव भोंडवे,आकाश सोनसळे ,आकाश भोंडवे ,औदुंबर भोंडवे ,भागीनाथ वादगे,आदी उपस्तीत होते . त्यावेळी महेश भोंडवे यांच्या निवस्थानी भेट देऊन भोजन केले. व गावातील युवा कार्यकर्त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन योग्य मार्गदर्शन केले.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close