जागतिक पोलिओ दिनानिमित्त वडवणीत रोटरी क्लबची कार रॅली संपन्न.

वडवणी /प्रतिनिधी :दि.24
२४ ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यानिमित्त शनिवारी सकाळी रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने शहरात कार रँली काढण्यात आली
पोलिओ या आजाराचे संपूर्ण जगातून समूळ उच्चाटन करणे व या आजाराबद्दल समाजामध्ये जागरूकता आणणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट रोटरी क्लबने डोळ्यासमोर ठेवून जगभरात मोहीम हाती घेतलेली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता आनंद मंगल कार्यालय येथून नगराध्यक्ष पुत्र मुन्ना मुंडे ,जेष्ठ पत्रकार सुभाष राव वाव्हळ यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील सर्व चौका-चौकात पोलिओ निर्मूलन बद्दल भोंग्याद्वारे जनजागृती करत साडेनऊ वाजेपर्यंत रेणुका माता मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये लहान मुलांना दोन थेंब डोसचे दिले जातात. हे करण्यात रोटरी क्लबचा सिंहाचा वाटा आहे. या रॅलीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर जगदीश टकले व चंद्रकांत करांडे हे होते. या रॅलीत संस्थापक चेअरमन डाॅ. भाऊसाहेब पुर्भे, विद्यमान अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार निपटे, सेक्रेटरी माधव पुरी, अँँड. श्रीराम लंगे , पञकार सुभाष वाव्हळ, अशोक निपटे, अनिल वाघमारे, डाॅ. दिनकर बोंगाने, डाॅ. जगदीश टकले, भंडारे, सुदामराव शिंदे, वचिष्ठ शेंडगे, चंद्रकांत करांडे, डाॅ. थोटे, दुटाळ महाराज, नवले, डाॅ. रविंद्र मुंडे, संतोष गोंडे, आदी क्लब मधील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
One Comment