श्री स्वामी समर्थ मार्गाच्या वतीने शिवछत्रपती विद्यालयात सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण…

छ. सभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.2
श्री स्वामी समर्थ(दिंडोरी प्रणित)सेवा मार्गाचे पिठाधीश आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ केंद्राच्या अंतर्गत शिवछत्रपती विद्यालय,बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे श्री गणपती अथर्वशीर्ष सामूहिक पठण उपक्रम राबवण्यात आले.या उपक्रमात शिवछत्रपती विद्यालयातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.एकूण 11 आवर्तन घेण्यात आले. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांत धार्मिक मूल्ये रुजवणे ही काळाची गरज आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे.अध्यात्माने मन,बुद्धी व हृदय शुद्ध राहून मुलांची स्मरणशक्ती दीर्घकाळ टिकून राहते. देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुलांमध्ये गणपती उत्सवाचे मूळ उद्दिष्ट टिकवून ठेवण्यासाठी असे उपक्रम विद्यालयात आवर्जून घेण्यात येतात. त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्काराची जडणघडण होते. या उपक्रमामुळे विद्यालयात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
उपक्रमाचे आयोजक प्रा.विद्या संजय भोसले व शिक्षकवृंद शिवछत्रपती विद्यालय यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्र बालसंस्कार युवाप्रबोधन विभागाचे आभार व्यक्त केले.
सामूहिक प्रार्थना घेत उपक्रमाची सांगता करण्यात आली.

