धनगर समाज महिला एकता परिषद संपन्न.

अंबड/प्रतिनिधी:दि.15
अहिल्यादेवी होळकर जन्म शताब्दी वर्षाच्या सुवर्णमयी योगावर महाराष्ट्रात प्रथमच गेली सत्तर वर्षात धनगर समाजातील महिला करीता हक्काचे व्यासपीठ तयार करण्याच्या क हेतुने व नवक्रांती च्या विचाराचे बीजारोपण करुन नियोजित सभा दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी चिंचवड पुणे येथे पार पडली.
या बैठकीस अॅड.वंदनाताई हाके,अॅड.रुपाली भोजने (सरपंच)विणा सोनवलकर, प्रतिमा काळे (लेखिका,कवयत्री) रेखा वसतकर,प्रिती शिंदे (नवलकर)व ईतर महिला भगिनी उपस्थित होत्या.तसेच लवकरच राज्यातील महिला भगिनींन करीता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला भगिनींनी भविष्यातील धनगर समाजाची परिवर्तनाची धुरा आपल्या खांद्यावर घेवून या बैठकीस उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हा अहिल्या रथ पुढे नेण्यासाठी आपले समाजातील प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे.या करीता आपण समाजातील सर्व महत्वाचा घटकांनी सहकार्य करावे.धनगर समाजातील महिलांनाही सामाजिक,राजकीय क्षेत्रामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श समोर ठेवून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही धनगर समाजातील महिलांसाठी सभा आयोजित करून महिलांनीही आता संघटित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांचे संघटन व महिला जागृतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन निहारिका खोदले यांनी केले आले आहे.