pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक

0 1 7 5 4 8

जालना/प्रतिनिधी, दि.13

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नामफलक मराठीत असणे (सुधारणा) अधिनियम, 2022 च्या कलम 36 (क) मध्ये अधिसुचनेनुसार सुधारणा केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांच्या मालकांनी अधिसुचनेची कोटेकोरपणे अंमलबजावणी करुन स्वत:च्या आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपितील मराठी भाषेत लावावेत, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
अधिसुचनेनूसार सर्व दुकाने, व्यापारी आस्थापना, हॉटेल, करमणुकीच्या ठिकाणांच्या आस्थापनांच्या नामफलक मराठीत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिसुचनेनुसार आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपितील मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची काळजी यावी, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे