दुर्ग मावळा प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचे प्रचार व प्रसार करणाऱ्या तसेच गड किल्ले यांचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त श्रीछत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा जवळ, विमला तलाव, उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.५५ रक्त दात्त्यांची नाव नोंदणी झाली त्यापैकी एकूण ३५ जणांचे रक्तदान झाले.सामाजिक कार्यकर्ते अशोक गावंड व सामाजिक कार्यकर्ते अजितदादा म्हात्रे यांच्या हस्ते शिव प्रतिमा व गणेश पूजन झाले. कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन प्रसिद्ध समलोचक राजेंद्र ठाकूर यांनी केले. दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग अध्यक्ष राज म्हात्रे, उपाध्यक्ष मनिष पाटील व इतर सर्व पदाधिकारी सदस्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. श्री साई ब्लड बँक पनवेलचे मोलाचे सहकार्य या रक्तदान शिबिराला लाभले.