जि.प.प्रा.शा.ताडपिंपळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन

● हिंदवी स्वराज्य गृप व ताडपिंपळगाव ग्रामपंचायतकडून विद्यार्थ्यांना केळी व शाळेकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप निबंध स्पर्धेत प्रथम,द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सतीश शेळके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव
कन्नड/कृष्णा घोडके,दि.26
कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथिल
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र देवगाव रंगारी ता. कन्नड येथे प्रजासत्त्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश मालकर यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहनापूर्वी प्रभातफेरी नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, कोळीगित, लावणी, नाटीका, चित्रपटातील गीते इत्यादी बाबीवर सुदर असे नृत्याचे सादरीकरण केले . हे नृत्य बघून उपस्थितांची मने जिंकली . ह्या कार्यक्रमाला गावातील पुरुष मंडळी व महिला मंडळी यांनी तोबा गर्दी केली . कार्यकम बघून सर्व गावकऱ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री काथार सरांनी व श्रीमती गोसावी मॅडम यांनी सुत्रसंचालना मध्ये सर्व लोकांना खिळवून ठेवून कार्यक्रमात रंगत आणली . राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम,द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा श्री सतीश शेळके यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गवळी सर, श्री दिवेकर सर, श्री पवार सर, श्री गोसावी सर श्री अंदुरे सर, श्री मालकर सर, श्रीमती बडगुजर मॅडम, श्रीमती बयाणी मॅडम, श्रीमती जारवाल मॅडम, श्रीमती टाले मॅडम श्रीमती गुंजाळ मॅडम यांनी परिश्रम घेतले.
हिंदवी स्वराज्य गृप ताडपिंपळगाव तर्फे सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप आणि ग्रामपंचायतकडून व शाळेकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कार्तिक गोरे व सर्व सदस्य, सरपंच श्रीमती सुशीला सोनवणे व सदस्य, श्री पाडवी साहेब, अंगणवाडी कार्यकर्ती सेविका तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.