जालना येथे राज्यस्तरीय मिनी व युथ टेनिसव्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न

● टेनिसव्हॉलीबॉल खेळास ५%आरक्षणासाठी प्रयत्न करणार…! — आ. नारायणराव कुचे
जालना/प्रतिनिधी:दि.5
जालना: येथील तिरूपती लॉन्समध्ये टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ जालनाच्या वतीने दि. १ ते ३ डिसेंबर दरम्यान २४ व्या राज्यस्तरीय मिनी व युथ टेनिसव्हॉलीबॉल मुले व मुली अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. या प्रसंगी आ. नारायणराव कुचे म्हणाले की, देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर टेनिसव्हॉलीबॉल खेळाची निर्मिती झाली आहे. या खेळांस प्राधान्य देण्यासाठी निश्चित भारतीय टेनिसव्हॉलीबॉल खेळास ५% आरक्षणासाठी प्रयत्न करु, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून २० जिल्ह्यातील २५० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार नारायणराव कुचे यांचे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक तथा आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉ.व्यंकटेश वांगवाड होते. स्वागताध्यक्ष म्हणून भास्करराव पाटील दानवे (आबा) (जिल्हाध्यक्ष टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ जालना तथा विधानसभा प्रमुख भाजपा, जालना) प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद विद्यागर (जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना) गणेश माळवे, (राज्य चिटणीस) नागनाथ आयलाने, उपायुक्त राज्य गुप्तवार्ता, संतोष वाबळे (क्रीडा मार्गदर्शक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना) तुळशिराम पाटील शेळके (माजी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, जालना) ज्ञानेश्वर ढोबळे (नगरसेवक) उद्योजक गोपाल ठोंबरे, बबनराव जाधव (सरपंच, दावलवाडी) स्पर्धा आयोजक तथा सचिव गजानन पाटील वाळके, प्रशांत नवगिरे, विजय गाडेकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सहभागी जिल्हे औरंगाबाद, बुलढाणा, बीड, परभणी, भंडारा, अहमदनगर, अकोला, लातूर, पुणे शहर, नांदेड, जालना, हिंगोली, यवतमाळ, सोलापूर शहर, सांगली, नाशिक आदी. आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य चिटणीस गणेश माळवे तर सुञसंचलन प्रा.नागेश कान्हेकर, आभार प्रदर्शन प्रा. विजय गाडेकर यांनी मानले.
सदरील स्पर्धा प्रकाश झोतात सुसज्ज ४ क्रीडांगणावर खेळविण्यात येत आहेत. आज संपन्न झालेले सामन्यांमध्ये परभणी, नाशिक, बीड, बुलढाणा संघांनी विजयी दौडघौड ठेवली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ जालनाचे अध्यक्ष भास्करराव पाटील दानवे (स्वागताध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव तथा स्पर्धेचे आयोजक गजानन पाटील वाळके, डॉ. प्रसाद मदन, प्रा. विजय गाडेकर, प्रा.प्रशांत नवगिरे, कृष्णा पाटील एखंडे, संजय पाटील एखंडे, सुभाष पारे, आशिष ओबेरॉय, सतिश नावाडे, साईनाथ वाडेकर, गणेश सुलताने, किरण पाटील, अनिकेत वाळके, प्रमोद खरात, जगत घुगे आदींसह आयोजन समितीने विशेष परिश्रम घेत आहे.
