डोणगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.3
डोणगाव वृत्तसेवा जाफराबाद तालुक्यातील येथे शनिवारी रोजी दि 3 डिसेंबर रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डोळ्याचे विविध आजार असल्यामुळे 140 रुग्णावर जालना येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे जालना येथील गणपती नेत्रालयाच्या वतीने डोणगाव येथे मोफत शिबिर आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डॉ संदीप , संतोष नाईक , आदित्य शिंदे , निखिल खंडागळे, गजानन कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती डोणगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार शेख कैसर, माजी सरपंच गंगाधर खरात, सदस्य मिलिंद जाधव, पत्रकार शेख फेरोज, बाबासाहेब पुंगळे, राजू घोडके, रमेश पिंपळे, राजेंद्र अंभोरे, तलाठी विजय गरड, शेख जाकेर, शेख सईद, शेख समीर, शेख अतीक, गणेश खोडखे, विठ्ठल हिवाळे, राजेंद्र पुंगळे, आदींची उपस्थिती होती व गणपती नेत्रालय च्या डॉ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला डोणगाव येथील नूतन विद्यालय शाळेच्या परिसरामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत शिबिराचे नागरिकांच्या डोळ्याची मोफत तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 275 रुग्णाची तपासणी करण्यात आले शास्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 140 रुग्णावर जालना येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे