Uncategorised

केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य – हंसराज अहीर

● हंसराज अहीर यांनी आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली,दि.3

केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले.
आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
श्री. अहीर पुढे म्हणाले, ‘देशभरात इतर मागासवर्गात जवळपास अडीच हजार जाती आहेत. पोट जातींसह 5 हजार 500 जाती इतर मागासवर्गात मोडतात. देशातील बहुतेक सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने इतर मागासवर्ग जातीत मोडणारे लोक आहेत. या सर्व बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थ‍िक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकासासाठी मागासवर्ग आयोग कार्यरत असून तो अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी, प्रयत्न करणार असल्याचे श्री अहीर यावेळी म्हणाले.
शासनाच्या योजनांचा लाभ देशातील सर्वच स्तरातील मागासवर्गापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या देशातील विषमता, असमानता संपविण्यासाठी प्रयत्नझाले पाहिजेत. भारतीय संविधानात हे अंर्तभूत आहे. त्याचप्रमाणे इतर मागास जातीतील सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

BHAGWAN DHANAGE

"Live न्युज महाराष्ट्र" च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रकाशित झालेल्या मजकुराची जबाबदारी त्या-त्या प्रतिनिधीची राहील .तसेच कोणताही न्यायालयीन वाद-विवाद उद्भवल्यास याचा खटला फक्त जालना जिल्हा न्यायालय कक्षेच्या अंतर्गतच चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!