Uncategorised
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गट ग्रा.पं.काजळा-पानखेडा तर्फे गावातील दिव्यांग,मागासवर्गीय महिला व कोरोनाग्रस्त विधवा यांना गरम ब्लॅंकेटचे वाटप

काजळा/प्रतिनिधी:दि.3
आज(दि.3) वार शनिवार या दिवशी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गट ग्रा.पं.काजळा-पानखेडा तर्फे गावातील नोंदणीकृत सर्व दिव्यांगांना तसेच मागासवर्गीय महिला व कोरोनाग्रस्त विधवा यांचा सत्कार करुन त्यांना थंडी पासुन बचाव होण्यासाठी ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच श्री रंगनाथ देवकाते, उपसरपंच श्री प्रकाश गावडे, सोसायटीचे चेअरमन व मा.सभापती श्री रघुनाथराव भोर्डे, पोलीस पाटील श्री लक्षमण पा.पैठणे, व्हा.चेअरमन श्री प्रल्हाद म.खोटे,मा.सरपंच श्री आसाराम गरड, श्री सुभाष करडे, ग्रा.पं.सदस्य श्री कैलास खंडेकर,श्री ज्ञानेश्वर बोबडे,ग्रा. वि.अधिकारी श्री पी.बी.राठोड,जि.प.कें.प्रा.शाळेचे मु.अ.श्री आर.आर.जोशी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.